आधार कार्डचा नवा अवतार! नाव-पत्ता गायब; फक्त फोटो अन् QR कोड, कशी आहे नवी डिझाईन? पाहा
भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असलेल्या आधार कार्डच्या डिझाइनमध्ये २०२६ मध्ये मोठे बदल होणार आहेत. अनेक ठिकाणी आधारची छायाप्रत (झेरॉक्स) देताना वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती असते, तीच चिंता लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
काय आहेत मुख्य बदल?
- नाव आणि पत्ता दिसणार नाही: नवीन आधार कार्डचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असणार असून, त्यावर आधीप्रमाणे तुमचे नाव, पत्ता आणि १२ अंकी आधार क्रमांक दिसणार नाही.
- फक्त फोटो आणि QR कोड: या कार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक सुरक्षित 'एनक्रिप्टेड' (encrypted) QR कोड असेल. कार्ड हरवले तरी तुमची माहिती कोणालाही सहज दिसणार नाही.
- QR कोडची खासियत: तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार क्रमांक या QR कोडमध्ये सुरक्षितपणे साठवलेले असतील. ही सर्व माहिती फक्त अधिकृत ॲप किंवा सरकारी स्कॅनरद्वारेच वाचता येईल, ज्यामुळे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला तुमचा डेटा मिळवणे जवळपास अशक्य होईल.
हा बदल का करण्यात आला? संस्थांकडे आधारच्या प्रती साठवून ठेवल्या गेल्याने डेटा गैरवापराचा धोका वाढतो. नागरिकांची गोपनीयता जपणे आणि फसवणूक थांबवणे हा या नव्या बदलामागील सर्वात मोठा उद्देश आहे.
नागरिकांनी काय करावे? हे नवीन आधार कार्ड अधिकृतपणे लागू होईपर्यंत नागरिकांनी UIDAI च्या अधिकृत ॲपचा वापर करून 'डिजिटल आधार' शेअर करावे. तसेच, अनोळखी ठिकाणी आधारची झेरॉक्स देताना विशेष सावधगिरी बाळगावी.
إرسال تعليق