राज्य कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता 34 % वाढीसह सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येणार .

 

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकिय , पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी 2022 पासुन 34 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाची प्रक्रिया सुरु झाली आहे . जानेवारी 2022 पासुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखिल या कालावधीमधील महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे .


त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2022 पर्यंत सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करणेसाठी स्थगिती देण्यात आलेली होती . माहे सप्टेंबर 2022 नंतर सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येणार आहे . त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचे अद्यापर्यंत पहीला /दुसरा हप्ता बाकी अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्याने पहीला व दुसरा हप्ताची रक्कम अदा करण्यात येणार आहे . त्याचबरोबर ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पहिला व दुसरा हप्ता बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना देखिल प्रथम प्राधान्याने अदा करण्यात येणार आहे .


वाढीव 34 टक्के डी.ए जुलै 2022 पुर्वीच लागु होणार


राज्य शासकिय , जिल्हा परिषद , अुनदानित , विनाअनुदानित , व इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पुर्वीच केंद्र सरकारप्रमाणे 34 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .याबाबत वित्त विभागाची सविस्तर अधिकृत्त प्रक्रिया सुरु झाली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article