स्वातंत्र्य सैनिक कै. नारायण बाबुराव घायाळ यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त मा.राजकुमार बळीराम घायाळ (सहायक डाक अधीक्षक पंढरपूर) व मा.दादा तुकाराम घायाळ (माजी तंटामुक्ती अध्यक्ष रांजणी)यांच्या मार्फत मोफत 50 सुकन्या समृध्दी योजना खाते रांजणी पोस्ट ऑफिस मध्ये काढण्यात येणार आहेत.खाते काढण्यासाठी मुलीचे वय 0 ते 10 इतके असायला हवे.
आवश्यक कागदपत्रे :-
1) वडील किंवा आई 3 फोटो
2) आधार कार्ड झेरॉक्स
3) पॅनकार्ड झेरॉक्स
4) मुलीचा जन्माचा दाखला /बोनाफाईड /आधार
खाते काढण्यासाठी फॉर्म व माहिती रांजणी पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहेत.तसेच फॉर्म श्री. दादा घायाळ व बिभीषण बोरगावे यांचेकडे उपलब्ध आहेत.शेवटची मुदत आहे.
सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी खाते (इं:Sukanya Samriddhi Account) ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे.या योजनेस भारत सरकारचे पाठबळ आहे.ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीचे शिक्षणासाठी व लग्नासाठी फंड जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते.
ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे दि. २२ जानेवारी २०१५ला विमोचित केल्या गेली.सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे ८.६% (आर्थिक वर्ष २०१६-१७साठी) इतके आहे. या योजनेत करलाभपण आहे. हे खाते कोणत्याही डाक कार्यालयात शाखेत उघडल्या जाऊ शकते.सुकन्या समृद्धी योजना भारत सरकार नरेंद्र मोदी यांनी सुरु केली . नरेंद्र मोदी मुलगी वाचावा , मुलगी शिकवा ही घोषणा केली
योजनेची वैशिष्ट्ये
१) या योजनेअंतर्गत १० वर्ष वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे पोस्ट ऑफिसात 'सुकन्या समृद्धी ' खाते उघडता येते ,यात किमान 250रु ठेवावे लागतात . एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात
२ ) खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास ( जी मुदत आधी असेल ती ) व्याजासह ठेवी परत मिळतात .
३) १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुदत असते उर्वरित रक्कम पुढे केव्हाही ( २१ वर्षे मुदत संपेपर्यंत )काढ़ता येईल
إرسال تعليق