GST Council: जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असताना दुसरीकडे ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजारानेही देशभरात थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. ब्लॅक फंगसवरील औषधे करातून सूट असलेल्या यादीत समाविष्ट करण्यात आली असून, आता त्यावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कर आकारला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
कोरोना संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जीएसटी परिषदेची बैठक झाली नव्हती. सुमारे ७ महिन्यांनंतर शुक्रवारी झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
إرسال تعليق