सोलापूर : मंगळवेढा न्यूज
सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी मिळाणार नाही. याबाबत शासनाने आदेश दिले आहेत.
सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, याला सोलापूरकरांसह जिल्ह्यातील सर्व पक्षांनी विरोध दर्शवला. अखेर शासनाने इंदापूरला पाच टीएमसी पाणी द्यायचे नाही, अशा आदेशाचे पत्र गुरुवारी (दि. २७) अखेर काढले. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे.
उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरी मिळाली होती. या मुद्द्याला जनहित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, तसेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला.
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी या प्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. गुरुवारी (दि. २७) राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती. आमदार संजय शिंदे हे मुंबईत होते. त्यांनी अखेर पाच टीएमसी पाणी न देण्याचे शासनाचे ते पत्र आपल्याकडे घेतलेच.
यावेळी आमदार संजय शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांची उपस्थिती होती. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांच्या सहीचे पत्र निघाले आहे.
Post a Comment