सकाळपासून चालू असलेल्या मतदानाला दुपारी थोडा ओझरता प्रतिसाद मिळाला.अटीतटीच्या लढाईत मतदानाला भगीरथ प्रतिसाद मिळत आहे.वडिलांची पुण्याई पारड्यात जड जात आहे असं चित्र सर्वत्र दिसून येत आहे.कोठेतरी जनतेत समाधान कमी दिसत असल्याचा हा परिणाम असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.ऐनवेळी वाड्याला मानणाऱ्या लोकांनी विचार बदला असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.
नानांनी जपलेल्या आया बाया नानासाठी भगीरथ ला मतदान टाकल असं खुलेआम बोलत असताना दिसून आल्या.वडील मुलाला संपती देतात हे नवीन नाही पण हा जनसमुदाय मुलाला देणारा बाप दुसरा होणार नाही असं चित्र आज सकाळ पासून पहायला मिळत आहे.
भाजपला ही निवडणूक जड जाणार हे मात्र जवळपास निश्चित झालं आहे.पण आवताडे यांना मानणारा गट पूर्ण ताकदीने मतदान खेचण्याचा प्रयत्न सर्वच आघाडीवर करत आहे.
या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे येणारा काळच ठरवेल .आज 2 तालुक्याच भविष्य बदलणार हे मात्र निश्चित झालं आहे.
إرسال تعليق