मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु


आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्यानं भंडारा पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला की, घातपात होता, याचा तपास पोलीसांकडून सुरु आहे.

Bhandara Crime The death of policeman who went meet his married girlfriend in middle of the night

भंडारा : जिल्याच्या गणेशपूर गावात मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाल्यानं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचं नाव महेश डोगरवार असं आहे. महेशची हत्या झाली की, इमारतीतून खाली उतरताना त्याचा मृत्यू झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.

रविवार मध्यरात्री पोलीस शिपाई महेश डोगरवार विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी याची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. पती रूममध्ये येत असल्याचं पाहून पोलीस शिपाई हा फ्लॅटच्या बालकनितून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु, त्याचा तोल गेल्यामुळे तो खाली पडला की, त्याची हत्या करण्यात आली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. महेश हा साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत होता. ही घटना भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथे घडली. भंडारा शहर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

रविवारी रात्रीच्या सुमारास पोलीस शिपाई त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्याकरता तिच्या फ्लॅटवर पोहोचला. याची कल्पना घरातीलच दुसऱ्या रूममध्ये असलेल्या महिलेच्या पतीसह मुलांना आली. दरम्यान, पतीने यासंदर्भात पत्नीला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, मद्यप्राशन केलेल्या पोलिसाने अंतर्वस्त्रांवरच महिलेच्या फ्लॅटच्या बाल्कनीचा वापर करून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यप्राशन केलेलं असल्यामुळे पोलीस शिपाई महेश डोगरवार याचा तोल गेला आणि तो खाली जमिनीवर कोसळला. डोक्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि पोलीस शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भंडारा शहर पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article