फार्मसीला अ‍ॅडमिशन घेताय? यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार |

फार्मसीला अ‍ॅडमिशन घेताय? यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार | 

राज्य सीईटी सेलने नुकसातच 'एमएचटी-सीईटी'चा निकाल जाहीर केला. यामध्ये ३ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी पात्र असतात. त्यामुळे मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. ​
More than 80th percentile required for admission to pharmacy

पुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार असल्याचे संकेत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. राज्यात फार्मसीच्या फक्त २५ हजार जागा असून, प्रवेश घेण्यासाठी साडेतीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पात्र आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त पर्सेंटाइल आहेत अशा विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश मिळेल असे सांगितले जात आहे. गेल्यावर्षी प्रवेशासाठीची किमान ७० पर्सेंटाइलची आवश्यकता होती, यंदा किमान १० ने कटऑफ वाढणार आहे. 


राज्य सीईटी सेलने नुकसातच 'एमएचटी-सीईटी'चा निकाल जाहीर केला. यामध्ये ३ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी पात्र असतात. त्यामुळे मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात फार्मसीचे शिक्षण देणाऱ्या सुमारे ३०० संस्था असून, त्यामध्ये २५ हजार विद्यार्थी क्षमता आहे. पुणे विभागात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात ८९ फार्मसी काॅलेज आहेत, त्यामध्ये ६ हजार ९८० तर, पुणे शहरात २७ संस्थांमध्ये २ हजार २० प्रवेश क्षमता आहे. गेल्या दोनतीन वर्षांपासून फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना, यंदा त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  

यामुळे वाढतोय कल
'कोवीड १९'मुळे आरोग्य विषयावर शासकीय तसेच वैयक्तिक पातळीवर महत्त्व लक्षात आले आहे. त्यादृष्टीने औषध, उपचार पद्धतीचा ही विचार केला जात. यात औषधनिर्माण व त्यांचे वितरण यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना महत्त्व आहे. 
फार्माको व्हिजिलन्स यासाठी आयटी कंपन्यांमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी आहे. तसेच संशोधन क्षेत्रात काम करता येऊ शकते आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फार्मसीकडे कल वाढत आहे. 

फार्मासीच्या १८० जागा 
फार्मसीमध्ये फार्माडी हा ५ वर्षाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी पुणे विभागात  ७ महाविद्यालयात फक्त १८० जागा उपलब्ध आहेत. याचा कटआॅफ देखील ९५ पर्सेंटाइलच्या पुढे असणार आहे. 

"सीईटीतील पात्र विद्यार्थी आणि प्रवेश क्षमता यामध्ये मोठी तफावत आहे. यावेळी सीईटीतील निकाल चांगला लागला आहे. गेल्यावर्षी ७० पर्सेंटाइलला देखील प्रवेश मिळतो होता, पण यंदा ८० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेशाची संधी जास्त उपलब्ध असेल. गेल्यावर्षी डी. वाय. पाटीलचा शेवटच्या फेरीचा कटऑफ ९५ पर्सेंटाइलच्या पुढे होता."
-  डॉ. सोहन चितलांगे, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल केमेस्ट्री अभ्यास मंडळ आणि प्राचार्य डी. वाय. पाटील फार्मसी काॅलेज पिंपरी. 

"गेल्या काही वर्षापासून फार्मसी क्षेत्राला महत्त्व आले आहे. पण 'कोवीड'मुळे याचे गांभीर्यही लक्षात आले आहे. विद्यार्थ्यांना संशोधन, नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय यापैकी कशातही करियर करता येते. सीईटीचा निकाल चांगला लागल्याने यावर्षी प्रवेशासाठी स्पर्धा वाढू शकेल."
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, पुणे विद्यापीठ

फार्मसी महाविद्यालय आणि प्रवेश क्षमता

                  महाविद्यालय  -   प्रवेश क्षमता
महाराष्ट्र -        ३००          -      २५०००
पुणे विभाग -    ८९          -        ६९८०
पुणे जिल्हा   -   २७          -         २०२० 

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article