एस एम अवताडे कंपनीच्या टिपरने घेतला आणखी एक बळी

 

 मोटारसायकल स्वारास धडक देऊन टिपर उजनी कालव्यात

  पंढरपूर : मागील 15 दिवसांपूर्वी वाखरी येथील एका जेष्ठ नागरिकाचा बळी घेतल्यानंतर एस एम अवताडे कंपनीच्या टिपरने आणखी एक बळी घेतला आहे. कासेगाव येथे एका मोटार सायकल स्वारास धडक देऊन हा बेफाम टिपर थेट उजनी कालव्यात गेला आहे. मंगळवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास कासेगाव हद्दीत हा अपघात झाला आहे.  पंढरपूर, तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका एस एम अवताडे कंपनीने घेतला असून कंपनीचे टिपर मोठ्या वेगाने रस्त्याने ये जा करीत असतात. याबाबत यापूर्वी अनेकवेळा नागरिक आणि छोट्या वाहन चालकांनी तक्रारी केलेल्या आहेत.  मागील महिन्यात या कंपनीचेच दोन टिपर एकमेकांना धडकले होते तर 15 दिवसांपूर्वी वाखरी येथील भागवत नागणे या जेष्ठ नागरिकाचा बळी याच कंपनीच्या टिपरने घेतला आहे. हा अपघात अद्याप विस्मरणात गेलेला नाही तोवर मंगळवारी कासेगाव हद्दीत उजनी कालव्यालगत एका दुचाकी स्वारास टिपरने जोरात धडक दिली.  या धडकेत मोटारसायकल ( क्र.mh13, cf 7062 ) चालक युवक जागीच ठार झाला आहे. अक्षय विलास पिसे ( वय 22, रा. मठ वस्ती,कासेगाव ) असे मयत युवकाचे नाव आहे. टिपर ( क्र. एम. एच. 13, ए. एक्स.2062 ) बेफाम वेगात होता, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा टिपर थेट उजनी कालव्यात जाऊन उभा राहिला.  या अपघातामुळे पुन्हा एकदा एस एम अवताडे कंपनीच्या बेफाम वाहनांचा विषय चर्चेत आला आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पो. ह. राठोड पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article