
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची नावे समोर आली आहे. आज दीपिका पदुकोण ,श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ड्रग्जचं सेवन केल्याप्रकरणी श्रद्धा कपूरची एनसीबीकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. यावेळी या सुशांतसिंह राजपूत प्रकरणी प्रश्न विचारण्यात आले असता श्रद्धानं सुशांत ड्रग्जचं सेवन करत असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. श्रद्धाने तर सुशांत सेटवरही ड्रग्जचं सेवन करायचा असं म्हटलं आहे.
एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की या चौकशी दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली. एनसीबीच्या चौकशीमध्ये श्रद्धा कपूरने अशी माहिती दिली आहे की छिछोरेच्या पार्टीमध्ये ती पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये तिने केवळ डान्स केला होता. तिने अशी माहिती दिली की तिने यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते.
श्रद्धा कपूरने असे म्हटले की, ती छिछोरेच्या पार्टीमध्ये गेली होती. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ते पवना फार्म हाऊसवर पोहोचले होते. दुपारी जेवल्यानंतर ते आयलँडला पोहोचले होते. श्रद्धाने अशी माहिती दिली की तिथे ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली. रात्री उशिरापर्यंत म्यूझिक लावून त्याठिकाणी पार्टी करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी ड्रग्ज घेतले पण तिने ड्रग्ज घेतले नाहीत.
एनसीबीतील सूत्रांनुसार, रियाच्या चौकशीत जी नावे समोर आली होती, त्यांची उलट तपासणी जयाकडून करण्यात आली. त्यामध्ये दोघांनी घेतलेली नावे सारखीच असल्याचे दिसून आले. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच आता काही सिनेतारकांना समन्स बजाविण्यात आले आहे.
إرسال تعليق