अजबच! बारा लाखांचे गाठोडे बाळगणाऱ्या 'त्या' फोटोमुळे प्रचंड मनस्ताप; काय घडले वाचा.. |
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांना दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नाशिक / नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांना दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
‘त्या’ फोटोमुळे खऱ्या लाभार्थ्यास प्रचंड मनस्ताप
सोशल मीडियावर मंगळवारी (ता. ८) दिवसभर एका शेतकऱ्याच्या डोक्यावर पैशाने भरलेले गाठोडे असलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला. यात चार एकर कोथिंबिरीसाठी साडेबारा लाख रुपये शेतकऱ्याला मिळाले, अशी माहितीदेखील टाकण्यात आली. खोट्या फोटोसह बातमीदेखील एका वृत्तपत्राने चालविली. याबाबत अधिक माहिती घेतली असता या फोटोतील माहिती खरी असून, फोटोमध्ये कोणीतरी खोडसाळपणा करत विनायक हेमाडे यांच्याऐवजी दुसऱ्याच शेतकऱ्याचा फोटो वापरत व्हायरल करण्यात आला. यामुळे हेमाडे यांना दिवसभर याबाबतीत फोन येऊन विचारपूस करण्यात आल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यासह मित्र, नातेवाइकांबरोबरच परिसरातील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. माध्यम प्रतिनिधींनीदेखील त्यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण माहिती घेतली.

إرسال تعليق