राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार

राज्यात अनलॉक 5 बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार
   

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत. 

रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत.

दुसरीकडे शाळा, महाविद्यालये हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल देखील बंदच राहणार आहे. मेट्रोही बंद राहणार राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र अनलॉक 5 मध्ये देखील धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article