सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप ८० टक्क्यांवर

 सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप ८० टक्क्यांवर

Thursday, 10 September 2020
example

सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्जवाटपासाठी देण्यात आलेल्या एकूण उद्दिष्ठापैकी ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी (८० टक्के) रुपयांचे वाटप झाले आहे. पहिल्या दीड महिन्यात रखडलेले कर्जवाटप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काहिसे वेगाने झाले.  

यंदा जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप पीकांची स्थिती चांगली राहिली. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांकडून यंदा कर्जाची मागणी वाढली होती. पण, अनेक बँका विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र सोईस्कर भूमिका घेतल्याने सुरुवातीला कर्जवाटप काहिसे रखडले होते. पहिल्या दीड महिन्यात ३० टक्क्यांच्या पुढेही कर्जवाटप पोचले नव्हते. पण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बँकांना फौजदारी कारवाईचा इशारा देताच बँका हलल्या आणि आज बँकांनी वेगाने कर्जवाटप सुरु केलेजिल्हा अग्रणी बँकेनेही पीक कर्ज वाटपाबाबत विशेष मोहीम हाती घेतली. त्यानुसार ३१ ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप होऊ शकले. ही रक्कम उद्दिष्टाच्या ८० टक्के आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला १४३८.५२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. 




राष्ट्रीयकृत बँकांची उदासिनता

जिल्ह्यातील खासगी बँकानी त्यांच्या उद्दिष्टाच्या १६३ टक्के, तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने सुमारे १४६ टक्के 
कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आतापर्यंत ६० टक्के कर्जवाटप करुन आपली उदासिनता कायम ठेवल्याचे दिसून येते. 

जिल्ह्यात यंदा खरीपाखालील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार पीक कर्जवाटप केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. त्यानुसार वाटप वेळेत आणि सर्वाधिक कसे होईल, यावर लक्ष दिले. 
- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर

बॅंकेचे नावकर्जवाटप उद्दिष्ट (रू. लाखांत)प्रत्यक्षात वाटप  टक्केवारी
राष्ट्रीयीकृत बॅंका१०५९६९.००६३५९९.०१६०.०२
खाजगी बॅंका १८२८६.००२९८५२.७८१६३.२५
जिल्हा मध्यवर्ती बॅंक१५४५७.०० १५६४३.७७१०१.२१ 
विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक४१४०.००६०८१.२९ १४६.८९ 
एकूण१४३८५२.००

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article