आ. परिचारकांच्या गाडीला कट मारला आणि इनोव्हा कार ने हाणल्या 4 पलट्या


पंढरपूर : 

विधानपरिषद सदस्य आ प्रशांत परिचारक यांच्या कारला कट मारून भरधाव गेलेल्या इनोव्हा कार ने त्यांच्या कार समोरच 4 पलट्या मारल्या. विशेष म्हणजे परत थांबून आम परिचारक यांनीच अपघातग्रस्त कार मधील लोकांची चौकशी केली.

रविवारी सायंकाळी साडे आठ च्या सुमारास आ प्रशांत परिचारक हे कोर्टी गावा कडे निघाले असता नवीन कराड नाक्याच्या पुढे 50 मिटर्स वर भरधाव वेगाने पाठीमागून येणारी इनोव्हा कार ( mh 45, n 7088 ) परिचारक यांच्या कार ला कट मारून पुढे गेली आणि अगदी समोरच 4 पलट्या मारल्या. प्रसंगावधान राखून परिचारक यांच्या चालकाने गाडी थांबवली.

अपघातग्रस्त इनोव्हा स्थानिक असून एका जेष्ठ वकिलाचा मुलगा ती चालवत होता अशी माहिती मिळाली आहे. कार मधील लोकांची विचारपूस करून ते जखमी नाहीत ना याची खात्री करून परिचारक पुढे निघून गेले. मात्र बेफाम इनोव्हा ने जोरात कट मारलेला असताना परिचारक याची कार मात्र अपघातग्रस्त होता होता वाचली.

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article