रांझणी येथे रेशनबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
पंढरपूर : रांझणी येथे रेशन मिळण्याबाबत भारतीय मानवाधिकार परिषदेने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.मंडळ अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी पंढरपूर,रांजणी मध्ये उपोषणाच्या ठिकाणी येऊन कागदपत्रे तपासणी करून निवेदन घेऊन मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. विष्णू शंकर बाबर पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बिबीशन रामचंद्र बोरगावे रांजणीचे मा. तंटामुक्ती अध्यक्ष बाबासो तुकाराम घायाळ इतर ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ आंबेडकर कॉन्टॅक्टर लेबर असोसिएशन पंढरपूर उपाध्यक्ष विजय दुर्योधन शेवडे व मंगळवेढा उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी भारतीय मानवाधिकार परिषदला उपोषणाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. रांजणी गावातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दिला व येणार्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन संध्याकाळी 5:00 नंतर उपोषण संपले असे जाहीर केले.
Post a Comment