महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेच्या युवती पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी कु. वृषाली इंगळे-पाटील यांची निवड



 सोलापूर:- मंगळवेढा  येथील कु. वृषाली पांडुरंग इंगळे-पाटील यांची महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेच्या युवती पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहण्यासोबतच सर्व पदवीधर युवतींचे आगामी काळात संघटन केले जाणार आहे. तसेच संघटनेची विचारधारा युवतींसमोर आणून संघटनेचे महत्व पटवून देऊन पदवीधर युवतींना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचे काम आगामी काळात केले जाईल असे वृषाली इंगळे -पाटील यांनी निवडीनंतर सांगितले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,   शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या पदवी शिक्षण घेणाऱ्या वि्यार्थ्यांचे प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुजितकुमार थिटे यांच्या आदेशानुसार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक बंडगर यांनी वृषाली यांना नियुक्तीचे पत्र दिले. नूतन युवती पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, कोल्हापूर , पुणे ,सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदवीधर कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.


Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article