तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांचा पीएम किसानमध्ये समावेश
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या गावाची पूर्ण यादी पाहू शकता. त्याठिकाणी तुम्हाला गावातील शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध होईल. तिथं तुम्ही गावातील किती शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला. कुणाला किती हप्त्यांमध्ये पैसे मिळाले. याची माहिती मिळू शकते.
गावातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला कसं पाहायचं?
सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
तिथे Payment Success टॅब खाली भारताचा नकाशा पाहायला मिळेल. तिथे खाली Dashboard लिहिलं असेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल.
तिथे Village Dashboard या पेजवर क्लिक करा
त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यानंतर शो बटनवर क्लिक करा. यानंतर माहिती येईल. तिथे आपण ज्या शेतकऱ्याची माहिती पाहायची असेल ती पाहता येईल.
11.66 कोटी शेतकऱ्यांना फायदा
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकऱ्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.
Post a Comment