पोटनिवडणूक लागायला अवकाश तोपर्यंत न्यूज पोर्टल , चॅनल यांना आर्थिक बळ देऊन स्वतः च्या पाठ थोपटणाऱ्या बातम्या यायला सुरू झाल्या आहेत. कोण कोणाची हवा असल्याचं सांगत आहे तर कोण न केलेल्या कामाचं श्रेय लाटत आहे .कोण धनगर समाजाचं नाव घेऊन स्वतःचा खिसा भरण्याचा प्रयत्न करत आहे तर कोण अजून मालकशाही मध्येच जनता जगतेय अश्या बातम्या देत आहेत.पण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता इतकी ही खुळी नाही की या गोष्टी त्यांना कळणार नाहीत . सर्वाच रंगरूप जनतेनं डोळ्यांनी बघितल आहे तेव्हा निःपक्ष पत्रकारिता हाच आपला आदर्श असला पाहिजे असं प्रतिपादन महालक्ष्मी टाइम्स च्या वृशाली इंगळे - पाटील यांनी सोलापूर न्यूज शी बोलताना दिलं.
काहीच दिवसांवर आलेल्या निवडणुकीत काही न्यूज पोर्टल व यूट्यूब न्यूज चॅनेल पक्षपात करत उमेदवारांच्या आर्थिक साहाय्यवर बातम्या देत आहेत. पण जनता ही दूध खुळी नाही हे आतापर्यंत सर्वच ठिकाणी पाहायला मिळालं आहे . आणि पोटनिवडणुकीत जनता कोणाला कोल देते हे वेळेचं ठरवेल.
या निवडणुकीत बारामतीचे साहेब हेच सर्वेसर्वा ठरणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे .भालके घराण्याचं राजकीय अस्तित्व , आवताडे घराण्याची मंगळवेढा तालुक्यावर ची पकड आणि परिचारक गटाचा पंतानंतरचा प्रवास पाहण्यासारखा असेल.तर शेला गोडसेंच्या रूपानं महिला उमेदवार म्हणून पर्याय असतील.
जनता आता सोशल मीडिया आणि अनधिकृत न्यूज पोर्टल च्या बातम्या यांच्यावर विश्वास ठेवणार नाही हा आजवरचा या दोन तालुक्यांचा इतिहास आहे.येणारा काळ अजून कोणते पत्ते उघडतो ते वेळच ठरवेल.
(प्रतिनिधी किशोर पाटील)
Post a Comment