मराठा आरक्षण स्थगितीनंतर युवकाची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी आमदारांना फोन केल्याची चर्चा

मराठा आरक्षण स्थगितीनंतर युवकाची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी आमदारांना फोन केल्याची चर्चा

whatsapp sharing buttonfacebook sharing buttontwitter sharing buttonlinkedin sharing buttonsharethis sharing button

The मंगळवेढा न्यूज

बीड | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात आत्महत्या सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड तालुक्यातील केतूरा गावच्या एका 18 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

विवेक राहाडे असे या आत्महत्या केलेल्या मराठा युवकाचे नाव असून तो बीड तालुक्यातील केतूरा गावचा आहे. 

विवेकला नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने तो अस्वस्थ होता. कारण जर मराठा आरक्षण असले असते तर त्याला महाविद्यालयात प्रवेश मिळाला असता अशी आर्त हाक त्यांच्या आई वडिलांनी दिली. 

नीट परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असले तरी आरक्षण असते तर त्याला प्रवेश मिळाला असता. मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे त्याची पुढच्या शिक्षणाची वाट कठीण असल्याची विवेकची भावना  झाली होती, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.

त्याचबरोबर आत्महत्या केलेल्या युवकाने आमदार विनायक मेटे यांना फोन करून सांगितले होते की, साहेब मराठा समाजाला जर आरक्षण नाही मिळाले तर आत्महत्या करावी लागेल. त्यानंतर आज त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहितीही निकटवर्तीयांनी दिली.

दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे मराठा समाजात आत्महत्येचे सत्र सुरुच राहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article