बँक ऑफ इंडियाची मंगळवेढा शाखा अनिश्‍चित काळासाठी बंद

बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे बँकेने आर्थिक व्यवहार अनिश्‍चित काळासाठी बंद केले आहेत.त्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी आलेले खातेदार रिकाम्या हाती परतले. 


अशा परिस्थितीतही खातेदारांकडून सोशल डिस्टन्स पालन न करणे, अनावश्‍यक कामासाठी बॅंकेत येणे, मास्क व्यवस्थित न लावणे यामुळे खातेदाराकडून संसर्गाचा प्रसार झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, बॅंक व्यवस्थापनाने अनिश्‍चित काळासाठी आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय स्टेट बॅंकेनेनंतर सर्वात मोठी असलेल्या बॅंक ऑफ इंडियाला याचा फटका बसल्याने खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.


मंगळवेढ्यातील पोस्ट बँकेतून AEPS व्यवहाराद्वारे तुम्ही तुमचे बँक ऑफ इंडिया अथवा इतर बँक खात्यातील पैसे काढू शकता.

कोरोना रुग्णांची संख्या शहर व तालुक्‍यात वाढू लागल्यामुळे रविवारी नगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यापारी असोसिएशनची नगरपालिकेच्या सभागृहात बैठक घेऊन  सोमवार पासून मंगळवेढा शहर पंधरा दिवस सकाळी 9 ते 2 या वेळेत चालू ठेवून इतर वेळी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या पाहण्यासाठी मंगळवेढा न्यूजला आजच subscribe करा व बेल आयकॉन वर क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article