स्वेरीच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन वेबिनार संपन्न

 स्वेरीच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन वेबिनार संपन्न


पंढरपूर : सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये स्वेरीकडून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्युट संचालित कॉलेज ऑफ फार्मसीकडून ‘हाऊ टू वीन ओव्हर ऑब्स्टॅकल्स अँड नर्चर युवर पॅशन’ या विषयावर इंटरप्रेनर अँड कंटेंट क्रिएटरचे युट्युबर हेमंत महतो यांचे वेबिनार आयोजीत करण्यात आलेले होते. ‘अपस्कील, रिस्कील युवर सेल्फ’ या वेबिनार सीरीज अंतर्गत या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला प्रा. प्रदीप जाधव यांनी या वेबिनारच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हेमंत महतो यांनी स्वतःचा यूट्यूब चैनल कसा डेव्हलप केला, त्यासाठी त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केले याची सक्सेस स्टोरी विद्यार्थ्यांना सांगितली. आपली स्वतःच्या कामाची पद्धत कशी असावी, त्यामध्ये शिस्तबद्धता, कामांमधील सचोटी या गोष्टी किती महत्त्वपूर्ण आहेत याबद्दलची माहिती सांगितली. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी यांचा बिजनेस माइंड कसे डेव्हलप करावे याबद्दल मार्गदर्शन केले. एखाद्या विषयावरील कन्टेन्ट क्रिएट करत असताना त्या विषयाचे ज्ञान, जिज्ञासा कशी असावी याचीही त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. पुढे त्यांनी एखादे काम करत असताना प्रयत्नातील सातत्य आणि यशापर्यंत पोहोचण्यात येणारे अडथळे पार करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बाबींवर मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. तसेच या वेबिनारमध्ये ‘एच. आर. एक्स्पेक्टेशन्स फ्रॉम फ्रेशर्स’ या विषयावर पूर्वी जैन, एच. आर. व ब्रांड मॅनेजर, पेपकस सॉफ्टवेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, इंदोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये बोलताना पूर्वी जैन यांनी विद्यार्थ्यांकडून कंपनीच्या असणाऱ्या अपेक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रिजूम कसा बनवावा, त्यामधील माहिती कशी असावी, लिंक्ड इन प्रोफाइल का महत्वाचे आहे, या गोष्टी सांगितल्या. तसेच या गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी का केल्या पाहिजेत, याचीही माहिती सांगितली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या ‘विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी जेव्हा कंपनीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांनी कोण कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत.’ याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. या वेबिनारसाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली ट्रेनिंग प्लेसमेंटचे प्रमुख प्रा. प्रदीप जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रज्ञा साळुंखे यांनी हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. वेबिनारच्या शेवटी प्रा.रामदास नाईकनवरे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article