सर्वांनाच मिळणार आरोग्य योजनेचा लाभ

सर्वांनाच मिळणार आरोग्य योजनेचा लाभ

Last Updated: May 24 2020 9:52PM
Responsive image

 : महेश पांढरे 
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनाच आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी या योजनेत लाभार्थी नसलेल्या कुटुंबांनाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कमी उत्पन्न गटातील सर्वच कुटुंबांना आता महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार असून या योजनेत अंगीकृत करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातही लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीने कार्यपद्धती विहित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, अथवा शुभ्र शिधापत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा अथवा शासनमान्य संस्थेचा सही शिक्का असलेले ओळखपत्र आवश्यक असणार आहे. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य, उपचाराची तातडीची गरज पाहून या कागदपत्रांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. 
सध्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 प्रकारचे उपचार केलेे जातात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1209 उपचार पुरविले जात असून याचा लाभ राज्यातील जवळपास 2 कोटी कुटुंबांना मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे 85 टक्के लोकसंख्येचा समावेश होत आहे. राज्यातील कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असलेल्या उर्वरित नागरिकांनासुद्धा या योजनेनुसार 996 उपचार पद्धतीचा लाभ घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये योग्य दराने उपचार करून घेण्यास मदत होणार आहे.
तसेच काही किरकोळ व काही मोठे उपचार व काही तपासण्या ज्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट नाहीत, त्या उपचार व तपासण्या या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत हमी तत्त्वावर करण्यात येणार असल्याचे शासनाने सांगितले आहे.
पीपीई किट, एन-95 मास्कसाठीही निधी देणार
कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या खासगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयितांवर उपचार करण्यासाठी पीपीई किट्स व एन-95 मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत सनियंत्रण करण्यात येणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक यांची असणार असून त्यांनी याची प्रतिपूर्ती करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार शासनावर पडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने करण्यात 

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article